अंजनगाव(वार्ताहर): बाळासाहेब बनसोडे प्रस्तुत नवरात्री उत्साहात सन्मान नवदुर्गांचा होम मिनीस्टर कार्यक्रमास अंजनगाव येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अंजनगाव येथील रेणुका देवी व तुळजाभवानी नवरात्री उत्सव वर्त मळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सौ.निर्मला विजय मारकड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून स्वराज्य फर्निचरचे संचालक सुरेश परकाळे व अंजनगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास परकाळे यांच्या वतीने पैठणी साडी बक्षिस स्वरूपात देण्यात आली.
द्वितीय क्रमांक- सौ.सारिका दादासोा कुचेकर यांनी मिळविला गावच्या सरपंच सौ.सविता परकाळे यांच्या वतीने टेबल फॅन बक्षिस स्वरूपात देण्यात आले. तृतीय क्रमांक-सौ.कावेरी वैभव मोटे यांना सौ.छाया दादासोा मोरे यांच्यावतीने प्रेशर कुकर बक्षिस देण्यात आले.
या सर्व विजेत्यांचा सत्कार गावचे उपसरपंच प्रदीप वायसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप परकाळे, प्रसिद्ध उद्योजक हनुमंत वायसे, सुभाष परकाळे, सत्यवान कुचेकर, बाळासाहेब कुचेकर, अरविंद परकाळे, शंकर मोटे, बंडू कुचेकर, प्रशांत कुचेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार अंजनगावचे तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांनी केले. महिलांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.