बारामती (वार्ताहर): त्रिरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सटवाजी नगर संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सम्राट अशोक विजयादशमीच्या मंगलदिनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी विजय देवकाते, सचिन साबळे, बा.न.प.आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सचिन थोरात इ. मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवर, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व संचालक मंडळ उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सुधीर सोनवणे, व्हा.चेअरमन नवनाथ बल्लाळ यांनी आभार व्यक्त केले.