बारामती(वार्ताहर): येथील मएसोचे कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर ’वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर होते .
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला . प्रमुख वक्ते गिरीश कदम व दत्तात्रय शेरखाने यांनी यावेळी डॉ . ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती दिली .
विद्यालयाच्या कन्या विभागात मोहिनी देशपांडे, सविता सनगर, बाळासाहेब अभंग यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले . विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गोष्टींच्या , अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे वाचन या वेळी विद्यार्थ्यांच्या कडून करून घेण्यात आले . यावेळी अनुवाचन , कथाकथन , वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या .
विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या ग्रंथालयातील ग्रंथ भंडाराचा ज्ञान वाढवण्यासाठी उपयोग करून घ्यावा .विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण वाचन कट्टा निर्माण करणार आहोत असे विचार प्रशालेचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक राजाराम गावडे, शेखर जाधव, चंदु गवळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीयश सकोजी व आभार सुरेश शिंदे यांनी मानले.