धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न:युवती अध्यक्षा सौ.आरती गव्हाळे-शेंडगे यांचे सर्वत्र कौतुक
बारामती(वार्ताहर): पुढं बाई रंग नग रंग नग हलगी वाजती या राधा खुडेंच्या गाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमास रंगत आली.
14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महिलांसाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.आरती गव्हाळे-शेंडगे यांनी केले होते. या कार्यक्रमास आमराई विभागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड.सुभाष ढोले, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती तालुका महिला अध्यक्षा सौ.वनिता बनकर, शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, नगरसेविका सौ.निता चव्हाण, डॉ.सुहासनी सातव, बारामती भगिनी मंडळाच्या अध्यक्षा राणी जगताप, माजी अध्यक्ष सुनिता शहा, सौ.मंगल बोरावके, सौ.संगिता काकडे, माजी नगरसेविका सौ.सुनीता देवरे, सौ.दिपाली पवार, सौ.रोहिणी आटोळे, सौ.सुप्रिया बर्गे, सौ.शितल कोठारी, पत्रकार तैनुर शेख, संदीप साबळे इ. मान्यवर उपस्थित होते.

सुर नवा, ध्यास नवा फेम गायिका राधा खुडे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आकर्षण ठरल्या. खुडे यांचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी डॉ.रूपनवर यांनी महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तर मंगल बोरावके यांनी उखाण्यांच्या माध्यमातून अमराई मधील महिलांचा उत्साह व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सौ.तावरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, गेली दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या संकटाला आपण सर्व सामोरो जात आहोत. विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीची वेगळी ओळख आहे. त्याचप्रमाणे आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा एक वेगळी ओळख होत आहे. सांस्कृतिक वारसा बारामतीला लाभलेला आहे. तोच वारसा सौ.आरती शेंडगे व त्यांचे कुटुंबिय पुढे नेत आहेत. महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा या दृष्टीने तसेच पिढ्यान् पिढ्यांचे सांस्कृतिक वैभव टिकून रहावे म्हणून अशा कार्यक्रमाची गरज आहे ती गरज आरती शेंडगे हे पूर्ण करीत आलेल्या आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रमणीनगर हाऊसिंग सोसायटी मधील महिलांनी विशेष परिश्रम घेतले.