बारामती(वार्ताहर): राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचा 74 वा वाढदिवस बारामती येथील श्री गणेश भाजी मंडई येथील शिवभोजन केंद्रावर पुरणपोळी जेवण देवून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन व शिवभोजन केंद्राचे संचालक प्रदीप (सोनू) लोणकर यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे उपाध्यक्ष निलेश मोरे, नितीन अंधारे, दादा जोगदंड, फारूख बागवान, शाहबाज बागवान, प्रमोद बनकर, नितीन चालक, योगेश सस्ते, सागर कदम, अजीज बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात ना.भुजबळ साहेबांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. नेत्रदान शिबिर, रुग्णवाहिका लोकार्पण, अंध बांधवांना साहित्याचे वाटप, पुस्तक व वेबसाइटचे प्रकाशन व अन्नदान इ. कार्यक्रम राबविण्यात आले. भुजबळ साहेबांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नेत्रदान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या वर्षभरात 75 लाख नागरीकांचे नेत्रदान मोहिम राबविणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. भुजबळ साहेबांनी स्वत:ची नेत्रदान नोंदणी करून सहभाग नोंदविला आहे.
बारामतीत पुरणपोळी जेवणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजु व्यक्तींनी याचा लाभ घेतला. यावेळी मंडई मधील भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व भाजी विक्रेत्यांनी छगन भूजबळ साहेबांना भरभरून शुभेच्छा दिल्या.