काही लोक काम न करता खूप वाजवतात, पण आम्ही वाजवायला कमी पडतो – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत, आणखीन कामे करायची आहेत. काही लोकं काम न करता खूप वाजवतात, पण आम्ही वाजवायला कमी पडतो अशी टिका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

इंदापूर शहरामध्ये 16 ऑक्टोंबर रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते मौर्य एम्पायर या कमर्शियल कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ पार पडला. याप्रसंगी ना.भरणे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बामसेफ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, नगराध्यक्ष अंकिता शहा, शकुंतला मखरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, गटनेते कैलास कदम, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, दीपक जाधव, महेंद्र रेडके, रामराजे कापरे, पोलीस निरीक्षक श्री.मुजावर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, बाळासाहेब खटके शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, पंजाबराव गायकवाड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते असे म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा चिमटा घेतला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मावळ येथे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यानंतर राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जाण्यावरून च्या विषयाच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील यांनी मिस्कीलपणे टोला लगावला होता. या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आले असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यावर आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा हात घालत नाव न घेता टीका केली आहे.

तालुक्यात आणखी खूप कामे झाली असती परंतु कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या असे असले तरी विकासाच्या बाबतीत इंदापूर तालुक्यात व बारामती, नांदेड यामध्ये खीळ बसली नाही. एवढी मोठी विकास कामे केली मात्र जनतेपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी वामन मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आलेल्या पाहुण्यांचा सत्कार राहुल मखरे व मखरे कुटुंबियांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!