गोतंडी वि.का.स.सोसायटीच्या वतीने 12 टक्के लाभांश जाहीर

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): तालुक्यातील नंबर एक क्रमाकाच्या गोतंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची लाभांश वाटप करण्याची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत 12 % लाभांश वाटप करण्यात आला.

सदर सभेस सोसायटीचे चेअरमन अरुण नलवडे, व्हॉइस चेअरमन अशोक घोडके, माजी चेअरमन आप्पा पाटील, गोतंडी ग्रामपंचायतीचे सरपंच व सोसायटीचे संचालक गुरुनाथ नलवडे, सचिव मारुती नलवडे, क्लार्क अक्षय भोसले, माजी सरपंच काशिनाथअण्णा शेटे, युनूस पठाण, दिनकर नलवडे, पापत साहेब, अनिल खराडे, बबन घाडगे, वसंत कांबळे, हौशीराव यादव, अशोक कदम इ. उपस्थित होते.

या सभेच्या दरम्यान कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालिका कांचन अशोक कदम यांची संचालकपदी बिनविरोध निवड झालेबद्दल व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑडिटरपदी रोहिणी अशोक काळे यांची निवड झालेबद्दल सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आप्पा पाटील सभेचे सुत्रसंचालन करताना म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे तातडीने शेतकर्‍यांना मिळवून देण्याचे काम व गेल्या पाच वर्षापासून सभासदांना न्याय मिळवून देण्याच काम सोसायटीच्या संचालक मंडळाने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!