बारामती(वार्ताहर): लखिमपूर खेरी येथे शेतकरी बांधवावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीत कॉंगे्रस आयतर्फे निषेध करण्यात आला.
यावेळी बारामती शहर कॉंग्रेस आयचे अध्यक्ष ऍड.अशोक इंगुले, बारामती शहर युवक कॉंग्रेस आयचे अध्यक्ष योगेश महाडीक, बारामती तालुका व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष सुरज भोसले, ओबीसी सेलचे रोहित बनकर, वैभव बुरूंगले, मिलिंद साबळे इ. मान्यवर उपस्थित होते.
लखीमपूर खेरी येथील शेतकर्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेस आय व शिवसेना व इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.