बारामती न्यायालयात मनोहरमामासह एकाला जामीन मंजूर : खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम कोण करणार?

बारामती(वार्ताहर): अंध:श्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या मनोहरमामा भोसले व सहआरोपी ओंकार शिंदे यांना बारामती जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी.भालेराव यांनी जामीन मंजूर केला.

मनोहरमामा यांना 60 हजार तर ओंकार शिंदे यांना तीस हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ऍड.रोहित गायकवाड, ऍड.हेमंत नरूटे व ऍड.रणजीत गावडे यांनी या दोघांच्या वतीने काम पाहिले.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावता कामा नये या म्हणी प्रमाणे खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम कोण करणार हा समाजात पडलेला खरा प्रश्र्न आहे. बारामती न्यायालयात मनोहरमामांना जामीन झाला. इतर ठिकाणी सुद्धा होईल. मामांचे प्रेमी अंध:श्रद्धेला समर्थन करतात असे काहींच्या मते बोलले जात आहे. पण मामांना खंडणी स्वरूपात करोडो रूपये मागणार्‍यांचे काय? हा विचार सुद्धा करणे गरजेचे आहे.

मामांवर फसवणूक, बलात्कार व अंध:श्रद्धा करतात या आरोपामुळे ते आज तुरूंगात आहेत. तक्रार देणारे कोण? याचा विचार केला असता सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. मामांना आणखी महिनाभर आत बसावे लागले तरी चालेल मात्र अशा टाळूवरच्या लोणी खाणार्‍यांना अद्दल घडली पाहिजे असेही मामांच्या प्रेमींचे मत आहे.

मोठ-मोठ्या मंत्र्यांना, पुढार्‍यांना आत बसावे लागले. मामा आत बसले म्हणून वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!