अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा समजल्या जाणारा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या नवनिर्वाचित संचालक मंडळांचा सत्कार माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पद्माताई भोसले, आप्पासाहेब जगदाळे इ. मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणार्या पहिल्या दहा साखर कारखान्यांमध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा 6 वा क्रमांक आहे. संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांचे प्रयत्नाने चालु हंगाम ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
बिनविरोध निवडणूकीमुळे पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक सहकार्यांना सोबत घेऊन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू राहणार असल्याचे संचालकांनी बोलताना व्यक्त केले.