बारामती(वार्ताहर): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे यांनी दि.20 जुलै 2019 रोजी बारामती नगरपरिषदे समोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे व्यायामशाळा सुरू करण्याची मागणीला यश आले आहे.
प्रथमतः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम स्थानिक खेळाडू आणि नागरिकांसाठी खुले करण्यात आले त्यानंतर याच ठिकाणी स्टेडियम मधील दालनात दादासोनगर, वडकेनगर, प्रबुद्धनगर तसेच याठिकाणी सरावासाठी येणार्या खेळाडूंसाठी आत्याधुनिक सोयी सुविधा युक्त व्यायामशाळा सुरू करण्यात यावी यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते. त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील करण्यात आला होता. व्यायाम शाळेसाठी आत्याधुनिक साहित्य आले असता रिपाइं (आठवले) पक्षाकडून सदरील व्यायामशाळेचे प्रतीकात्मक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेवक गणेश सोनवणे, पक्षाचे राज्य संघटक विजय सोनवणे, जिल्हा सचिव सुनिल शिंदे, जिल्हा महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, रजनी साळवे इ.कार्यकर्ते तसेच मोईन बागवान,शहाजी कदम,अविनाश कांबळे,राहुल कांबळे तसेच गणेश जगताप आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.