बारामती(वार्ताहर): व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. जडणारे अनेक रोग टाळता येऊन शरीर निरोगी ठेवता येते या उद्देशाने प्रभाग क्र.17 च्या नगरसेविका मयुरी शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचा शुभारंभ केला. या हेल्थ क्लबचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेविका सौ.रूपाली गायकवाड, सौ.अनिता जगताप, मा.नगरसेवक रमेश मोरे, सुरज शिंदे, पंकज सस्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर संघटक शक्ती भंडारे, सुमित सोनवणे, अमर भंडारे, प्रशांत भालेराव, अमोल भोसले, संदिप मोरे, महेंद्र मोरे, निवास सोनवणे, कमलाकर सोनवणे, श्रीकांत पाथरकर, मंगेश साबळे, सचिन हजारे, पप्पू साबळे, रणजीत पवार, सुरज झोडगे इ. मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. खासगी जीमची वाढती फी पाहता सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. व्यायामाची इच्छा असतानाही व्यायामाकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. या हेल्थ क्लबचा तळागळातील युवकांना फायदा होणार आहे. प्रभाग क्र.17 मधील ही दुसरी व्यायामशाळा सुरू झाली आहे.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून केले. नगरसेवक प्रभागातील विकासकामांना चालना देण्यासाठी नगरसेवकांची भूमिका महत्वाची असते ती भूमिका वेळोवेळी मयुरी शिंदे चोखपणे बजावित असतात त्यामुळे प्रभागात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते.
मन व मनगट मजबुतीसाठी नगरसेविका सौ.मयुरी शिंदे यांचे कार्य
शिका, संघटित व्हावा व संघर्ष करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रूजविण्यासाठी मयुरी शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी बांधकाम सभापती असताना मन मजबुत करण्यासाठी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रभागात वाचनालयास सुरूवात केली. युवकांचे मनगट मजबुत करण्यासाठी प्रभागात दोन व्यायामशाळा सुरू केल्या. मन आणि मनगट मजबूत असेल तर कितीही मोठे संकट आपोआप गळून पडते हे त्यांनी कामातून दाखवून दिले आहे. मनाच्या मजबुतीसाठी विविध विषयातील वाचन, योग्य विवेकी व्यक्तींची संगत आणि मनगट म्हणजेच शारीरिक मजबुतीसाठी जोरदार व्यायाम गरजेचा आहे. हा उद्देश ठेवून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबची सुरूवात केली.