बारामती(वार्ताहर): बारामती सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10वा.30 सहयोग सहयोग भवन भिगवण रोड जळोची बारामती येथून ऑनलाईन तउ/जAतच (जींहशी र्ईवळे तर्ळीीरश्र चशरपी) द्वारे कोरोना नियमांचे पालन करत संपन्न झाली. या सभेस मा.ना.श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे ऑनलाईन उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांचे वतीने उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी केले. अहवाल वर्षात बँकेच्या ठेवी रु.2261.31 कोटी व कर्जवाटप रु.1402.03 कोटी पर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेचा शाखाविस्तार अहवाल वर्षात 36 शाखा व 1 विस्तारित कक्ष असा झाला आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. बँकेस अहवाल वर्षात रु. 11.3 कोटीचा नफा झालेला असून सभासदांना शेकडा 12% इतका लाभांष जाहीर केलेला आहे. तसेच बँकेचे 18095 सभासद असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बँक आपल्या ग्राहकांना यु.पी.आय., आर.टी. जी.एस., नेफ्ट, ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पैनकार्ड काढून देणे, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट सुविधा, विमा सेवा, वीज बिल भरणा सुविधा इ. सुविधा देत असल्याचे सांगितले.
तसेच आता हळू हळू जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक अर्थव्यवस्था सुधारत असून व्यवसाय पूर्ववत सुरु होत असून मागील काळात लॉकडाऊन, संचारबंदी च्या काळात खातेदारांनी बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून बँकेस केलेल्या सहकार्याबद्दल खातेदारांचे आभार मानले.
सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरु केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले.
रिझर्व बँकेने संचालक मंडळाव्यतिरिक्त व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचनेनुसार बँकेने तज्ञ व्यक्तींचे समावेश असलेले व्यवस्थापकीय मंडळ स्थापन केलेले आहे. या मंडळावर समिती अध्यक्ष म्हणून अविनाश लगड, संचालक म्हणून प्रितम पहाडे (सी.ए.), ऍड. सतिश सालपे, तज्ञ सदस्य म्हणून श्रीनिवास बहुळकर, गिरीश सातव (सी.ए.), इंद्रजीत धुमाळ व पदसिद्ध कार्यकारी संचालक म्हणून रविंद्र बनकर यांची निवड झाल्याबद्दल सभेने समाधान व्यक्त केले.
या ऑनलाईन सभेस प्रा. ज्ञानदेव बुरुंगले सर, ऍड. कारीमभाई बागवान, सुभाष ढोले, सुर्यकांत गादिया, किरणशेठ क्षिरसागर, डॉ.विजय भिसे या सभासदांनी आपल्या सूचना सभेपुढे मांडल्या.
तसेच या सभेस बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, ऍड. शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजय तुपे, सुभाष जांभळकर, उध्दव गावडे, सुरेश देवकाते, विजयराव गालिंदे, कपिल बोरावके, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, सौ. नुपूर शहा, प्रितम पहाडे, ऍड. सतिश सालपे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्रीनिवास बहुळकर, इंद्रजीत धुमाळ, गिरीश सातव यांचेसह कार्यकारी संचालक रविंद्र बनकर, सरव्यवस्थापक विनोद रावळ व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते. सभेचा समारोप बँकेचे संचालक देवेंद्र शिर्के यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.