बारामती(वार्ताहर): सायकल चालवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण इंधन वाचवा. व्यसन मुक्त जीवन, चिंता मुक्त जीवन असा संदेश देत राजेगाव (ता.दौंड) येथील राजेंद्र दत्तात्रय कदम यांनी चक्कम 2 हजार 300 कि.मी.चा सायकल प्रवास पूर्ण केला. या प्रवासाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्र्स ने घेतली आहे.
दि.15 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2021 पर्यंत मुंबई ते पश्चिम बंगाल (कलकत्ता हावडा ब्रिज) असा 20 दिवस 2300 कि.मी. अंतर सायकल प्रवास करीत पूर्ण केला.
राजेंद्र कदम बारामतीत आले असता महात्मा फुले ऑटो रिक्षा संघटना सटवाजीनगर, पानगल्ली, गुणवडी चौक बारामती यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला लावणी नृत्य करून वेड लावलेले लावणी हृदयसम्राट गुणवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य बाबजी कांबळे व पिळदार शरीर करून संपूर्ण युवक वर्गाला वेड लावलेले पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष संतोष जगताप तसेच सर्व ऑटोरिक्षा संघटनाचे सर्व सदस्य मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.