बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 50 उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली असल्याचे आयोजक मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
रविवारी दि.3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. एकता इंग्लिश मीडियम स्कूल,मोरगाव रोड, टोलनाक्याजवळ,बारामती,या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील (मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख, नवबौद्ध, पारसी) उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणारे किंवा पहिल्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत शिकत असणार्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घेऊन त्यांना आलताफ सय्यद यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षापासून विद्यार्थ्यांचे कर्जप्रकरण करीत आलेलो आहे. या शैक्षणिक कर्जाचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार या कर्जप्रकरणात जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात येतील अशी माहितीही अल्ताफ सय्यद यांनी दिली.
यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत व प्रास्ताविक बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद यांनी केले. परवेज सय्यद, सुभान कुरेशी,सलीम तांबोळी, आसिफ झारी, आकलाज सय्यद, मुबीन आतार, हारूण(राजु) शेख,वसीम कुरेशी, इम्रान मोमीन, तन्वीर इनामदार, मुजाहिद शेख, अफरोज मुजावर, शाहीद सय्यद, जुबेर शेख, आसिफ शेख , इम्रान सादिक मोमीन, जावेद मंजलापुरे, मो.गौस कुरेशी इ. मोलाचे सहकार्य केले.