बारामती(वार्ताहर): सतत समाजामध्ये प्रत्येक घडामोडीवर करडी नजर ठेवून काम करणारे मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लास ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे बारामती तालुका अध्यक्ष इरफान गुलामअली शेख यांनी गेल्या 6 दिवसांपासून ड्रेनेज लाईन तुंबल्याची व्हॉटस्ऍप पोस्ट टाकताच गटनेते सचिन सातव, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे यांनी दखल घेत तातडीने काम मार्गी लावल्याने इरफान शेख यांचे नागरीकांमध्ये कौतुक होत आहे.
कसबा लेंडीपट्टी येथील काझी बोळ येथे गेल्या सहा दिवसांपासून ड्रेनेज लाईन तुंबली होती. तुंबलेले पाणी उलट दिशेने पुन्हा येथील रहिवाश्यांच्या घरात आल्याने तीव्र दुर्गंधी व आरोग्यास धोका निर्माण झाला होता. येथील नागरीकांना आपल्या हक्क व कर्तव्याचा विसर पडलेला होता. इरफान शेख यांनी व्हॉटस्ऍप पोस्ट प्रसिद्ध केल्याने आरोग्य विभाग व नगरसेवकांनी तातडीने घटनास्थळी येऊन काम मार्गी लावले. यावेळी गटनेते सचिन सातव यांनी दाखविलेली तत्परता व इरफान शेख यांनी प्रसिद्ध केलेली पोस्टमुळे काम मार्गी लागल्याने या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेवटी नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे व सफाई कर्मचारी यांनी दाखविलेल्या तत्परतेचे इरफान शेख यांनी आभार मानले.