बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिनात 421 अर्जांपैकी 83 अर्जांची निर्गती

बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिन घेण्यात आला. या दिनात 421 प्रलंबित अर्जांपैकी 83 अर्जांची निर्गती करण्यात आली.
  या तक्रार दिनास 140 अर्जदार उपस्थित होते. महिना अखेरीस 375 वरिष्ठ, 46 कनिष्ठ असे मिळून 421 अर्ज दाखल होते. पुर्वी दाखल असलेल्या एफआयआर वरून दोन अर्ज फाईल करण्यात आले तर 49 अर्जामध्ये तडजोड करण्यात आली. दिवाणी स्वरूपाच्या 30 तक्रारी तर इतर कार्यालयाशी संबंधीत 2 तक्रारी असे सर्व मिळून 83 अर्जांची निर्गती करण्यात आली.
  सीआरपीसी 102 नुसार एक वाहन हस्तांतरण तर कोर्टाच्या आदेशान्वये 2 वाहने व इतर 2 मुद्देमाल असे तक्रारदारांना मुद्देमाल/कागदपत्रांचे हस्तांतरण करण्यात आले. शहर पोलीस स्टेशनला कोणाचे अर्ज प्रलंबित असतील त्यांनी अशा दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन पो.नि.नामदेव शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!