बा.न.प.निवडणूकीत 19 प्रभाग, 39 नगरसेवक : सन 2011 च्या जनगणनेनुसार होणार प्रभाग रचना

बारामती(वार्ताहर): डिसेंबर-2021 ते फेब्रुवारी-2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या निवडणूका सन 2011 च्या जनगणनेनुसार होणार असून बारामती नगरपरिषदेत 19 प्रभाग व 39 नगरसेवक असणार आहेत.

दि.20 ऑगस्ट 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून) पत्रान्वये कळविले आहे. कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही दि.23 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात यावी. या आराखड्याची गोपनियता बाळगण्यात यावी. तात्काळ आयोगाला ई-मेलद्वारे त्वरीत अवगत करावे असेही पत्रात म्हटले आहे.

परिशिष्ट-अ मध्ये कशा पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडता तयार करण्याचा याबाबत मार्गदर्शन सुद्धा केले आहे. परिशिष्ट-ब मध्ये गुगलअर्थ/एमआरएसएसी च्या नकाशांवर प्रभागरचनेची मांडणी करण्याची कार्यपद्धती सुद्धा दिलेली आहे. यानंतर आरक्षण व सोडतीचा सविस्तर कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोगाकडून निर्गमित करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोग उपायुक्त अविनाश सणस यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!