अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी (वार्ताहर): कित्येक मंदिरात भक्तगण नागपूजेसाठी गर्दी करतात. शास्त्रात सापाच्या पूजेचा उल्लेखही आहे. मंदिराच्या शिवालयात जावून पूजा केलीतर तुम्हाला सापासह शिवपूजेचा पुण्य लाभ मिळेल असे म्हटले जाते. मात्र,चक्क इंदापूर तालुक्यातील गोतोंडी गावातील गौतमेश्र्वर मंदिरात नागाचे दर्शन झाले आहे.
आज महादेवाचा वार सोमवार असल्याने सकाळी मंदिरात नाग पाहिल्यानंतर याठिकाणी असणार्या युवकांनी लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतला. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊनमुळे धार्मिकस्थळे बंद आहेत. भक्तांचे जाणे-येणे मंदिरात नसल्याने याठिकाणी मुक्या जनावरांनी आसरा घेतला आहे. नागराजाने याठिकाणी दर्शन देवून एक प्रकारे साक्ष दिली आहे की, मंदिरे लवकर उघडा नाहीतर या मंदिरात आमचे साम्राज्य कायम राहिल असे येथे नागरीकांमध्ये बोलले जात होते.