बारामती लोक अदालतीमध्ये 2 हजार 352 खटले निकाली

बारामती(वार्ताहर): बारामती येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये 2 हजार 352 खटले निकाली काढण्यात आले असून 5 कोटी 74 लाख 79 हजार 259 रूपयांचा महसुल वसुल करण्यात आला असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मा श्रीमती जे पी दरेकर यांनी सांगितले.

तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय बारामती व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी दि 25 सप्टेंबर 2021रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन श्रीमती जे.पी.दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सकाळी 10 वा. दीपप्रज्वलन करून लोक अदालतीच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली. यावेळी तदर्थ तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.जे. बांगडे, न्यायाधीश जे.ए.शेख, तसेच न्यायाधीश श्री.कांबळे, श्री.गिरे, व बारामती वकील संघटना अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे हे मान्यवर उपस्थित होते.

वैवाहिक वाद, दिवाणी खटल्यांसह मोटार अपघात, एनआय ऍक्ट, औद्योगिक वाद, घरपट्टी, पाणीपट्टी आदी प्रकरणांवर न्यायनिवाडा झाला.प्रलंबित खटले218 दाखल पूर्व प्रकरणे 2134 असे एकुण 2352 प्रकरणे निकाली काढणेत आले निवाड्यासाठी एकुण 10774 प्रकरणे ठेवण्यात आले होते. प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले.

जिल्हा न्यायाधीश-1 व अति.सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज झाले. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे व कार्यकरणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी केले व अध्यक्षीय मनोगत मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा श्रीमती जे पी दरेकर मॅडम यांनी केले व सुत्र संचालन ऍड.धीरज लालबिगे यांनी केले आभार संघटनेचे सचिव ऍड.अजित बनसोडे यांनी मांडले या कार्यक्रमास बहुसंख्य वकील, पक्षकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!