बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्याने व सूचनेनुसार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजनेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील (मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख, नवबौद्ध, पारसी) उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे प्रक्रियेचा शुभारंभ रविवारी दि.3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. एकता इंग्लिश मीडियम स्कूल,मोरगाव रोड, टोलनाक्याजवळ,बारामती,या ठिकाणी उपस्थित रहावे. याठिकाणी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणारे किंवा पहिल्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत शिकत असणार्या सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याठिकाणी येणार्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात येतील अशी माहितीही अल्ताफ सय्यद यांनी दिली.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी :-
अल्ताफ सय्यद (9665526001) परवेज सय्यद (9422327786) सुभान कुरेशी (9881236821) सलीम तांबोळी (A 9881020020) आसिफ झारी (9860237786), आकलाज सय्यद (9881020318), मुबीन आतार (9850139814), हारूण(राजु) शेख (9890029046), वसीम कुरेशी (9850670873), इम्रान मोमीन (7276769143), तन्वीर इनामदार (8087862880), मुजाहिद शेख(9922889904), अफरोज मुजावर (9970076823), शाहीद सय्यद (9850469415), जुबेर शेख (9823608927), आसिफ शेख (7350181070) इम्रान सादिक मोमीन (9595101015), जावेद मंजलापुरे (9860635783), मो.गौस कुरेशी (8055878843)