बारामती(वार्ताहर): ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी आरोग्य मित्र कृष्णा जेवडे यांची राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र देवून निवड केली.
यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमिन शेख, तालुका अध्यक्ष अस्लम शेख, उपाध्यक्ष डॉ.पोपट कुंभार, कार्याध्यक्ष सोमनाथ इंगळे, बारामती शहर सचिव बाळासाहेब सरतापे, ऍड.अशोक पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
गेली दोन वर्ष कोरोना काळात विविध हॉस्पीटलला डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय पुरविणे, रूग्णांची सेवा करणे, ब्लड उपलब्ध करून देणे इ. आरोग्य क्षेत्रात कोरोनाला दोन हात करीत सामाजिक दृष्टीकोन ठेवून काम केले. या कार्याची दखल घेत व सामाजिक कार्याची आवड पाहता महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत कृष्णा जेवडे यांची नियुक्ती केली.