अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर शहरातील युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून बॅकवर्ड ऍन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन (बामसेफ) च्या बहुजन मुक्ती पार्टीमध्येे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे पश्चिम महाराष्ट्र समिक्षा सचिव नानासाहेब चव्हाण, शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय (डोनाल्ड) शिंदे, वसिम शेख, सुरज धाईंजे, बलभीम महाराज राऊत, आझाद सय्यद, नागेश भोसले, रोहित ढावरे, मुनेर (मुन्ना) पठाण इ. पदाधिकारी उपस्थित होते.
इंदापूर नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यासमोर ठेवून बहुजन मुक्ती पार्टीची बांधणी सुरू आहे. येणार्या प्रत्येक निवडणूकांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार असेल असेही ऍड.मखरे यांनी सांगितले.
कर्मयोगी कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवार न दिल्याने एकतर्फी निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी तू कर रडल्यासारखे मी करतो मारल्यासारखे अशी परिस्थिती दिसत आहे. या दोघांच्या भांडणात येणार्या नगरपरिषदेच्या निवडणूकीत बहुजन मुक्ती पार्टी चमक दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे.