इंदापूर तहसिलमध्ये केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात निवेदन देवून केला निषेध

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा भारत बंद पुकारण्यात आला होता. इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी देशाची राजधानी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची हाक दिली. त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने शेतकर्‍यांना उध्वस्त करण्यासाठी लादलेले तीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईचा निषेध करण्यासाठी इंदापूर तहसिल कार्यालयात निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी इंदापूर कॉंग्रेस शहराध्यक्ष चिमणभाई भगवान, कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष डॉ.संतोष होगले, इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे सचिव व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य एम.बी.लोंढे, इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस निवास शेळके, पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास पाटील, पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस जाकीर काझी, इंदापूर तालुका युवक प्रवक्ते आकाश पवार, इंदापूर तालुका युवकचे उपाध्यक्ष विकास बनकर, अंकुशराव भोसले, अनिकेत चंदनशिवे आदी उपस्थितीत होते.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह देशातील अनेक विरोधी पक्षांनी शेतकर्‍यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिलाय. राहुल गांधी म्हणाले, शेतकर्‍यांचा अहिंसक सत्याग्रह अखंडपणे सुरू आहे. मात्र, शेतकर्‍यांचे शोषण करणार्‍या सरकारला हे आवडत नसल्याने हा भारत बंद आहे. 40 शेतकरी संघटनांची समन्वय समिती असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने कृषी कायद्याविरोधात दंड थोपटत भारत बंदची घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!