अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): सलग तीन वर्ष ऊस गाळप करणार्या सभासदास कारखान्याची उमेदवारी लढविण्याची अट शासनाने शिथील केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे कारखाना गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रीया कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभांसदांकडून येत आहेत.
स्वर्गीय शंकरराव पाटील व लीलावती पाटील हे हयात असताना त्यांनी शेतकर्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचे काम केले व कारखाना उत्कृष्ट पद्धतीने सांभाळला मात्र त्यांच्या पश्चात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कारखान्याचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे करता आले नाही त्यांनी मनमानी कारभार राबवला असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठकीत बोलताना सांगितले.
सभासदांच्या मते सलग तीन वर्ष नाही तर एक वर्ष गाळपास दिलेल्या ऊसाचे पैसे मिळत नाही. त्यामुळे सलग तीन वर्ष ऊस गाळपास देण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे. इंदापूरच्या राजकारणात गेल्या 20 वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांनी सत्ता भोगली आहे. त्यामुळे येथील स्थानिक संस्था त्यांच्याच अधिपत्त्याखाली राहणार यात तिळमात्र शंका नाही.
इंदापूरचे आमदार राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे हे गेली 7 वर्षापासून इंदापूरचा विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करीत आलेले आहेत. पाटील यांनी 20 वर्षात स्वत:चा किंवा त्यांच्या अधिपत्त्याखाली असणार्या संस्थांचा विकास न करता इंदापूरचा व इंदापूरचे नागरीक केंद्रस्थानी माणून विकासात्मक काम केले असते तर आजही त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले असते. गेल्या 7 वर्षात ना.भरणे यांनी इंदापूरच्या विकासाकडे जातीने लक्ष दिल्याने आज इंदापूरचा जो विकासात्मक कायापालट झाला तो प्रत्यक्षदर्शनी दिसत आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची सद्यस्थितीतील सभासद व कामगारांची परिस्थिती पाहिल्यास कारखाना खरंच कोणाचा फायदा करीत आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ना.दत्तात्रय भरणे गेल्या 7 वर्षात एवढा इंदापूरचा कायापालट करीत असतील तर आणखी 7 वर्षात इंदापूरचे रूपडे बदलल्याशिवाय राहणार नाही असेही येथील नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
पाटील व भरणे यांच्या कार्यातील तफावत पाहिल्यास नागरीक कोणाकडे झुकतील हे सांगणे म्हणजे गैर ठरेल. साहजीकच कर्मयोगी कारखान्यासाठी उमेदवार मिळणे कठीण जाणार यात कोणतीही शंका नाही.
आमदार जरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा असला तरी पक्षातील पदाधिकार्यांचे संघटन कौशल्य आज मितीस शून्य असल्याचेही लोकांमध्ये बोलले जात आहे. या निवडणूकीची तयारी गेल्या 6 महिन्यांपूर्वी केली असती तर आज उमेद्वार पाहण्याची गरज पडली नसती असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे.