देव दगडात, देवळात नसून तो माणसात आहे हे ज्यांनी सांगितले ते निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज. देऊळ म्हणजे त्या काळाचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचागच म्हटले तरी चालेल, देऊळ म्हणजे सार्वजनिक रिकार्ड हापीस असे परखड मत देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या समग्र साहित्यामध्ये व्यक्त करणारे महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे होय.
मनोहर उर्फ मामा भोसले यांचे लहानांपासून-थोरांपर्यंत, गरीबांपासून-श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून- विद्वानापर्यंत सर्व स्तरातील स्त्री-पुरूष त्यांचे चाहते, प्रेम करणारे आहेत. आज त्याच्यावर खालच्या स्तरावर जावून तक्रारी होत आहेत. काही वेळेला असा ही प्रश्र्न उपस्थित होतो तक्रार देणारे कोण? त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती काय? ते कोणाच्या हातातले बाहुले तर ठरत नाही ना? कारण दोन-तीन वर्षापूर्वीच्या तक्रारी पुढे येत असतील तर हा सर्व तपासाअंती समोर येणारा भाग आहे.
समाजाला सन्मार्गाला लावायचे असल्यास विविध बहुरंगी हौसे-नौसे व गौसे प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडण्यासाठी होऊन गेलेल्या संतांना चमत्कार दाखविण्याची काही हौस नव्हती. पण कार्य सिद्धीस जावे म्हणून संत ज्ञानदेव महाराजांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले हा इतिहास साक्ष देतो. मामांनी आजपर्यंत जे काही केले ते प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी नव्हे तर पदोपदी, वेळोवेळी व प्रसंगानुसार घडत आलेले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. योगसिद्धीतून अंत:करण जाणणे म्हणजे बुवाबाजी म्हणता येईल का?
ए.बेस नावाच्या कंपनीत पेट्रोल पंपावर 300 रूपये मासिक पगारावर काम करणारे धीरूभाई अंबानी यांनी ज्याप्रमाणे महत्वाकांक्षा ठेवून इतर लोकांचे मन जाणून घेतले आणि उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. अंबानी यांनी सुद्धा लोकांची मने जाणली आणि त्यानुसार समाजात खूप मोठे काम केले. मग एकेकाळी बोंबील विकणारा मन्या कसा झाला मनोहरमामा हे सांगणे कितपत योग्य आहे. एक गुजराती माणूस पेट्रोलपंपावरून सर्वात मोठा उद्योगपती होत असेल तर बोंबील विकणारा मोठा झालेला का आवडत नाही हा खरा प्रश्र्न आहे.

कित्येक वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे की, ज्याचं मन आपल्या मनाशी जुळते त्याचीच संगत आपल्याला आवडते. आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसाचीच संगत करावी. जो क्षोभ निर्माण करतो, मन अस्वस्थ करतो त्याला दूर ठेवणे चांगले. ज्याचे वर्तन आपल्या मूल्याशी जुळत नाही त्याचा सहवास करू नये हे सांगितलेले असताना चार ते पाच व्यक्ती सोडले तर मामांशी इतक्या लोकांशी संगत का ठेवली. मूल्य जुळत नसतानाही त्यांच्याशी सहवास का ठेवला हाही प्रश्र्न मनाला विचलीत केल्याशिवाय राहत नाही.
आज कित्येक लोकं काहींना गुरू मानतात. त्याने सांगितलेल्या वळणावर चालतात आणि त्यामध्ये कित्येकांना यश मिळाले आहे. माणसांची श्रद्धा व अंगी असणारा अभिमान व अहंकार दूर होत असेल, येणारी संकटे नष्ट होत असतील तर जीवनात व जीवनाला वळण देणारा गुरू पाहिजे. त्यामुळे या मनोहरमामांना गुरू रूपांत तळागाळातील माणसांनी स्वीकारले असावे. आपल्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत त्या विचारांच्याही पलीकडे जावून प्रत्येक गोष्टी जपणार्याला गुरू म्हणता येते. मामांनी आपण जनतेपेक्षा वेगळे आहोत असे कधीही दाखविले नाही. आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवितो त्यास गुरू म्हणता येईल. चैतन्य हेच गुरूचे स्वरूप आहे. त्यांचे अंत:करण खूप मोठे आहे.
मामांना गुरू स्वरूपात मानणार्यांच्या मते चुका सुधारण्यासाठी व भविष्यात होणार्या चुका टाळण्यासाठी मनोहरमामांचा पदोपदी आशीर्वाद महत्वाचा आहे. शरीर, मन व आत्मा या तीन गोष्टींनी माणुस बनलेला आहे. शरीर व मन यांचे कल्याण होण्यासाठी विज्ञानाची गरज असते मात्र आत्म्याचे कल्याण होण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता असते आणि या अध्यात्माचे मार्गदर्शन फक्त असे गुरूच करू शकतात हे कोणीही नाकारू शकत नाही.
अंगी असणारा अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन मामांसारखे गुरू सांगू शकतात. म्हणून म्हणतात ना, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. विविध संतांनी सुद्धा लोकांना सन्मार्ग दाखविला त्याच संतांच्या पावला वर पाऊल टाकत मामा समाजात काम करीत आहेत. आपण जे कर्म करतो ते गुरूशिवाय केले तर त्याचे फळ मिळत नाही हे ही तितकेच सत्य आहे.
आजच्या कलियुगातील परिस्थितीत अधिकृत शासनाचा परवाना घेऊन उद्योग, व्यवसाय करणार्यांकडून सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक, अडवणूक व पिळवणूक होत असते.मात्र, ज्यांच्याकडे अधिकृत परवाना नाही मात्र त्या ग्राहकाला, व्यक्तीला त्या उद्योग, व्यवसाय करणार्यावर विश्र्वासार्हता आहे. मात्र त्या अनाधिकृत उद्योग व्यवसाय करणार्यांकडून एक चूक झाली तर तो ग्राहक व्यक्ती जपलेली विश्र्वासार्हतेचा तक्रारीत रूपांतरीत करतो आणि त्यास त्रास देतो. पण जो शासनाचा अधिकृत परवाना घेऊन राजरोसपणे ग्राहकांची फसवणूक करतो त्याबाबत संबंधित ग्राहक तोंड सुद्धा उघडत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
मनोहरमामांकडे राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मंडळी तासंतास वाट पाहत होती. मंत्री-महोदयांना वेळ देत होते. आज मात्र त्यांच्यावर जे संकट आले आहे अशा संकट समयी सर्वांनी हात वर केले. मे.कोर्टात ज्यावेळी त्यांना हजर केले जाते त्यावेळी मामांवर जीवापाड प्रेम करणारा सर्वसामान्य व्यक्ती अश्रू पुसताना दिसत होता. इतक्या लवकर लोकांच्या संवेदना बोथट झाल्या का?
उंदरगाव (ता.करमाळा) याठिकाणी बेकायदेशीर मठ बांधला म्हटले जाते. मग येथील ग्रामपंचायतीने त्यावेळी काम थांबविले का नाही. मठाच्या जागेच्या खरेदीत फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. ज्यावेळी खरेदी दिली त्यानंतर त्या जागेला नोंद लागली तत्पूर्वी फसवणूक झाली असलेबाबत तक्रारी का दाखल केल्या नाहीत.
आपल्याला एवढे मोठ-मोठे संत, महात्मे, महापुरूष लाभले या सर्वांनी कोणासाठी काम केले. या सर्वांना कोणी त्रास दिला, त्रास देणारे कोण होते पै-पाहुणे, नातलग व कुटुंबातील व्यक्ती या व्यतिरीक्त दुसरे कोणी नव्हते. कोणत्याही समाजातील इतिहास पाहिला असता कोणी कोणाला विरोध केला व कशासाठी केला त्यामुळे मनोहरमामांना जो काही विरोध होत आहे तो का होत आहे हे सर्वांना ज्ञात आहे. लोहा लोहेको काटता है, त्याप्रमाणे झाले आहे व होत आहे. मनोहरमामा कायमचे आत बसतील असे नाही. आज ना उद्या ते बाहेर येतील झालेले आरोप ठोस पुराव्याअभावी फेटाळण्यात येतील. आर्थिक, सामाजिक स्थितीमध्ये बदल झाल्यास जवळच्यांना तर कधीच चांगले वाटत नाही. एक म्हण प्रचलित आहे निंदनाचं घर असावे शेजारी असाच प्रकार समोर येत आहे.
राजकीय मंडळी दर पंचवार्षिक निवडणूकीला वेगवेगळे आश्र्वासन देत नागरीकांना फसवत आलेले आहे. माझी फसवणूक झाली म्हणून या राजकीय मंडळींच्या विरोधात का तक्रार देत नाही किंवा आवाज उठवीत नाही. पवित्र संविधानाचा सतत भंग करणारी ही मंडळी आहेत. तरीही यांच्यावर कारवाई होत नाही.
पंढरपूरचे विठ्ठल वा विठोबा हे तुकाराम महाराजांचे आराध्यदैवत होते. मग थेट विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकता. ज्ञानेश्र्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या निघणार्या पालख्या, दिंड्या यामध्ये कशासाठी सहभागी होऊन नामगजर पायपीट करीत जायचे असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. मग कोणी कोणाचे भक्त, गुरू असतील आणि त्या देव, गुरूचे अनुकरण समाजात करीत असतील तर यात वावगे काय?
आज सर्वसामान्य माणूस बाजारात गेला असता एखादी वस्तू इतकी पारखून घेतो कारण त्यास मूल्य मोजावे लागणार म्हणून, प्रत्येक गोष्ट तो पारखून, हिशोब करून घेत असतो. काय चांगले काय वाईट आहे याचे त्यास चांगले ज्ञान अवगत असते. तो वस्तुच्या किंमतीपेक्षा जास्तीची रक्कम अशीच त्या विक्रेत्यास देत नाही. मग एखादी व्यक्ती काहीही न करता पैसे मागत असेल किंवा फसवणूक करीत असेल तर त्याचे ज्ञान त्यास अवगत असलेच पाहिजे. मग त्यावेळी त्याची बुद्धी, मन, शरीर काय शेण खायला गेलेले असते का? माणसाची फसवणूक झाली तर तो सहज बोलून जातो पैसे गेले काही हरकत नाही मात्र, थोड्या पैशातच मला अक्कल आली. मग सर्वसामान्य माणूस लाखो रूपये मामाला कसे देतो? आया ऊँट पहाड के निचे याप्रमाणे पैसे उकळण्याचा उद्देश मामांकडून आहे का? असाही प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना व मामांच्या प्रेमींना पडलेला आहे.
खरच दुःखद बाब आहे की ती स्वार्था मंडळी आज दिसेनाशी झाली आहेत. आरोप सिद्ध व्हायच्या आधीच गुन्हेगारा म्हणत social media आणि काही reporters च्या personal page वर मामा आणि आम्हा भक्तांवर खुपच वाईट comments करुण नीच दरजयाची भाषा वापरली जात आहे.
न्याय करायला शासन समर्थ आहे. पण त्या आधिच त्यांची अशा प्रकारे बदनाम करायची अनुमती ह्या मंडळींना कोण देत. Publicly हे करणे कायद्यात मान्य आहे का?
Mama वरकितीहीआरोप होऊ द्यात मामांचे भक्तगणmama सोबत आहेत आज ना आमचा देव निर्दोष सुटणार ??