बारामती(वार्ताहर): सह्याद्री सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री छत्रपती शाहू हायस्कूल या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे, डॉ.मनोज खोमणे, डॉ.बापू भोई, डॉ. बालगुडे, डॉ.शिरकांडे, डॉ.श्रीकांत पवार, डॉ.सुषमा हिंगणे, नगरसेवक राजेंद्र बनकर, जयसिंग देशमुख, कुंदन लालबिगे, अनिल कदम, सिद्धनाथ भोकरे, श्री.तावरे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला तालुकाध्यक्षा सौ.वनिता बनकर, सहारा फाऊंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद, मुख्याध्यापक श्री.साळुंखे इ.मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

प्रथमत: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. 100 दिव्यांग व्यक्तींची नोंद करून प्रथम 30 व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले. जेष्ठ नागरिक व दुसरा डोस घेणार्या नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रावर सेल्फी पॉईंट केल्याने लसीकरण झालेनंतर प्रत्येकाने सेल्फी काढत आनंद व्यक्त करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे सह्याद्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी गुलाबराव माने यांनी सांगितले. या केंद्रावर प्रशस्त जागा, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी,सोशल डिस्टसिंग सुविधेमुळे लस घेणार्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सदरचा उपक्रमास सह्याद्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी माने, मा.नगरसेवक अनिल कदम, धनंजय भाऊ देशमुख ट्रस्टचे अध्यक्ष ओंकार देशमुख, हनुमंत भापकर, सुदर्शन निचळ, विजय लोखंडे, महादेव सुर्यवंशी, किशोर काशीद, ऋग्वेद सातपुते, आप्पा हिंगसे, सुधीर महामुनी, तुकाराम कांबळे, संजय शिंदे, सारस भोसले, अनिकेत भापकर, अनिल सातव,अभिजित बनकर,वैभव पारधे, राजेंद्र खराडे, आदित्य हिंगणे, मयूर चव्हाण, संजयसिंह बोरे, प्रा.दिनेश सरोदे, डॉ.नीलम कुमार शिरकांडे, डॉ.बालगुडे, डॉ. श्रीकांत पवार इ. मोलाचे सहकार्य केले. यावेळी सौ.वैशाली भुजबळ, सौ.किशोरी कदम आणि कु.स्वाती या परिचारीकांनी प्रत्येकाला लस दिली.