बारामती(वार्ताहर): बारामतीचे शरीरसौष्ठव पट्टू संतोष जगताप यांची पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल इंदापूरचे आमदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
निमित्त होते भिगवण येथील आर्यन हॉटेल बार-रेस्टॉरंट ऍण्ड लॉजिंग उद्घाटनाचे याप्रसंगी श्री.जगताप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत भिगवणचे सरपंच, उपसरपंच, भिगवण पंचायत समितीचे सदस्य इ. मान्यवर उपस्थित होते.

या हॉटेलचे मालक विश्र्वास देवकाते, शिवाजी देवकाते, शहाजी देवकाते यांनी संतोष जगताप यांचा शरीरसौष्ठव प्रशिक्षकाचे काम, विविध ठिकाणी शरीरसौष्ठव स्पर्धेतील कामगिरी या सर्व बाबींचा विचार करीत राज्यमंत्री व माजी संसदीय मंत्री यांच्या हस्ते या उद्घाटन प्रसंगी सत्कार केला.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी भवन कसबा याठिकाणी निवड झालेबद्दल माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे, जि.प.सदस्या सौ.मिनाक्षी तावरे, पं.स.सभापती निता फरांदे, धनवान वदक, शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
संतोष जगताप हे अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ संचलित व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी विविध शरीरसौष्ठव पट्टू तयार केले आहेत. येणार्या काळात हे पट्टू चमक दाखविल्या शिवाय राहणार नाही. त्यांची इच्छाशक्ती, कष्ट, संघर्ष हे विविध स्पर्धेतून दिसून येते. जिल्ह्यात होणार्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना मिळणारा सन्मान म्हणजे बारामतीचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देणार्या बारामतीकरांचा सन्मान आहे असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.