पुणे: दि मुस्लीम को-ऑप बँक लि.पुणेची वार्षिक सर्वसाधारण सभा आझम कॅम्पस्मधील डॉ.ए.आर.शेख असेंमब्ली हॉल पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. 1 ते 19 सभेपुढील विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. गेली 45 वर्षे निवडून येऊन मुस्लीम बँकेचे संचालकपद भूषविणारे पी.ए. इनामदार यांचा बारामतीच्या सभासदांकडून सत्कार करण्यात आला.
बँकेचे व्हाईचेअरमन एस.ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज पूर्ण झाले. प्रथमत: कोरोना काळात दगावलेल्या सर्व भारतीयांचे तसेच अहवाल साली निधन झालेल्या बँकेच्या सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरूवात करण्यात आली.
यावेळी लुकमान खान, ऍड.आय्युब शेख, तडवी दानिश खान, तस्लीम खान, मुन्वर शेख, चिरागुद्दीन शेख, तबस्सुम इनामदार, आलताफ सय्यद, तन्वीर इनामदार, ऍड.एन अशरफी हे संचालक उपस्थित होते.
सकाळी 10 वा. सभेस सुरूवात करण्यात आली. बँकेचे सचिव डॉ.हारून सय्यद यांनी अहवाल वाचन केले. 1 ते 19 सभेपुढील विषय वाचून त्यास सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेच्या ठेवी 602 कोटी, निव्वळ नफा 2.88 कोटी, ऍडव्हान्सेस 335 कोटी, निव्वळ मूल्य 65 कोटी, सीआरएआर 24.64 टक्के, ऑडीट-अ वर्ग, एकुण एनपीए 18.61 टक्के असून निव्वळ एनपीए 13.13 टक्के आहे. बँकेच्या 26 शाखा आहेत.

सभेचे कामकाज पूर्ण झालेनंतर बारामती नगरपरिषदेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद यांनी बँकेच्या गेली 45 वर्ष निवडून येणारे भारतातील एकमेव संचालक पी.ए. इनामदार आहेत त्यामुळे त्यांचे सर्व सभासदांना कौतुक आहे. त्यांचा बारामतीच्या सभासदांकडून शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी परवेज सय्यद, आलताफ सय्यद, अफ्रोज मुजावर, निसार शेख, निसार बागवान, सुबहान कुरेशी, रिजवान सय्यद, तैनुर शेख, राजु शेख इ. सभासद उपस्थित होते.पी.ए.इनामदार यांनी शैक्षणिक, बँकींग व सहकार क्षेत्रात भरीव असे काम केलेले आहे. बँकेचे संचालक मंडळाने सुद्धा पी.ए.इनामदार यांचा सत्कार केला. शेवटी आभार व्यक्त करून सभा सपल्याचे जाहीर करण्यात आले.
सर्वसाधारण सभा होऊ नये म्हणून सहकार न्यायालयात काही संचालक मंडळींनी अपिल केले होते. मात्र सहकार न्यायालयाने अपिल मंजूर न करता ठरलेल्या वेळेत व दिवशी सर्वसाधारण सभा होणार म्हणून सांगितले.