गुल पूनावाला बागेला कॅमेरे बसवावेत : पु.जि.ग्रामीण भा.ज.पा.अनुसूचित जाती मोर्चाची मागणी

बारामती(वार्ताहर): मुंबईत महिलेवर अत्याचार करून हत्त्या करण्यात आली या घटनेच्या पार्श्र्वभूमीवर बारामती नगरपरिषद गुल पूनावाला गार्डनला सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी पुणे जिल्हा ग्रामीण भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी सौ.पद्मश्री दाईंगडे यांना देण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथे महिलेवर अमानुष अत्याचार होऊन महिलेची हत्या करण्यात आली ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे बारामती नगर परिषद सार्वजनिक उद्यान येथे महिला मुली दररोज आरोग्य संवर्धनासाठी येत असतात मुंबईतील झालेल्या घटनेमुळे महिला व मुली यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.

सार्वजनिक उद्यान गुल पुनावाला गार्डन या ठिकाणी अशा अमानवीय घटना घडू शकतात त्यामुळे दक्षता म्हणून तात्काळ या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे जर पंधरा दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास एखादी काळीमा फासणारी अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही दिलेल्या निवेदना म्हटले आहे.

निवेदन देते समयी साजन अडसूळ, अक्षय गायकवाड, शैलेश खरात, सागर भिसे, शरद भगत, संजय दराडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!