बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने, नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेच्या 1 ते 8 शाळांना क्रीडा साहित्य उपलब्ध झाले.
क्रिडांगण विकास अनुदान 2020-21 वार्षिक योजनेंतर्गत हे साहित्य उपलब्ध झाले आहे. 90% मागासवर्गीय विद्यार्थी असणार्या शाळांना ही योजना लागू होती. त्यानुसार क्रिडा जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांचेकडे सौ.शिंदे यांनी दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी मागणी केली होती. केलेली मागणी मान्य करून 52 प्रकारचे क्रिडा साहित्य उपलब्ध झाले त्यात प्रामुख्याने मैदानी खेळाचे साहित्य व खोलीतील बैठी खेळाचे साहित्यांचा समावेश आहे. प्रत्येकी शाळेला 3 लाख रु. किंमतीचे साहित्य मिळाले आहे.
शिक्षण समिती बा.न.प मार्फत नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी क्रिडा साहित्यांची मागणी केली होती तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे येथे सातत्याने पाठपुरावा केला.
शिक्षण समिती सभापती बेबीमरीयम बागवान, नगरसेविका मयुरी सुरज शिंदे व मुख्याध्यापक श्री.चव्हाण,श्री.ढोले यांनी क्रीडा साहित्यांची पाहणी केली.