बारामती(वार्ताहर): प्रहार दिव्यांग संघटना बारामती तालुकाध्यक्ष मृत्युंजय सावंत याच्यावर रविवार दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्यामध्ये सावंत याच्या डाव्या हाताची दोन्ही बोटे फ्रॅक्चर झाली असुन जबर जखमी झाले आहेत.
सदरचा हल्ला बारामती शहर जलशुद्धीकरण केंद्र, पाटस रोड, बारामती येथे झाला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंपग संघटनेच्या तालुका अध्यक्ष यांच्यावर असा भ्याड हल्ला होणे समाजिकदृष्ट्या निंदनीय बाब आहे , प्रहार अपंग संघटनेनी या भ्याड हल्याचा निषेध केला आहे.