बारामती(वार्ताहर): कै.प्रकाशजी मोहनजी लालबिगे यांचे गुरुवार दि.9 सप्टेंबर 2021 रोजी दुःखद निधन झाले आहे.
कै.लालबिगे हे बारामती नगर परिषद जकात विभागांमध्ये जकात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बारामती सहकारी बँकेचे वीस वर्ष संचालक म्हणून चोख जबाबदारी बजाविली. दोन वेळा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. उघडा मारुती गणेशोत्सव तरुण मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक, सामाजिक कार्य केले. भगवान वीर गोगादेव निशान आखाड्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून नेहमीच सामाजिक कामासाठी अग्रेसर राहिले आहेत.
प्रत्येकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. नगरपरिषदेतील कर्मचार्यांना प्रत्येक बाबतीत सहकार्य व अडचणी सोडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. बँकेमध्ये संचालक ,उपाध्यक्ष असताना त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचार्यांशी अतुट असे नाते निर्माण केले होते.
त्यांच्या मागे पत्नी, बा.न.प. स्वच्छता निरीक्षक अजय प्रकाश लालबिगे, डॉ.विजय प्रकाश लालबिगे, सुना, नातू कु ऋतुराज अजय लालबिगे( सिव्हिल इंजिनियर) व विराज विजय लालबिगे आणि दोन नाती सुष्मिता व ममता असा परिवार आहे. त्यांच्या अंतयात्रेस सामाजिक, राजकीय, शासकीय, बँकींग क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.