बारामती दि.15:- मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम अधिकाअधिक गतीमान होण्यासाठी व मतदार नाव नोंदणी प्रकिया सोपी करण्यासाठी Voter Helpline App (VHA) मोबाईल ॲप विकसित केले आहे.
ॲप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. Google play store वरुन Voter Helpline App Download करणे. Download झाल्यानंतर New user वरती Tick करून Mobaile No टाकूण OTP आल्यावर Verified करणे. त्यानंतर Email ID, Epic No &password टाकावा password हा 6अंकी असावा.
Voter Helpline App (VHA) मुळे पुढील फायदे होतात. मतदारांना मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं.6 चा अर्ज भरता येतो. यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 अर्ज भरता येतो, मतदार यादीतील स्थलांतरीतसाठी नमुना नं.8 अर्ज भरणे, मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी नमुना नं.7 अर्ज भरणे, मतदार ओळखपत्र बदलुन घेण्यासाठी अर्ज करणे, मतदार नोंदणी संदर्भात काही अडचण असल्यास ऑनलाईन तक्रार नोंदवता येते व मतदार यादीतील नाव शोधणे इत्यादी मतदार संघातील सदस्यांची माहितीही मतदारांना Voter Helpline App (VHA) मोबाईल ॲपमळे उपलब्ध होणार आहे.
तरी मतदारांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी 201 बारामती विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार विजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.