बारामती(वार्ताहर): आमराई विहिरीवर 5 दक्ष लिटरची पाण्याची टाकी उभारल्याने आमराई विभागात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. नगरसेविका मयुरी शिंदे यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
प्रभाग क्र.17 आमराई भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, उपगटनेत्या सविता जाधव, बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, नगरसेविका अश्विनी गालिंदे ,निता चव्हाण, अनिता जगताप, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, हिराबाई धोत्रे, अभिजित चव्हाण, कुणाल गालिंदे, दिनेश जगताप, दिपक गायकवाड, सुरज शिंदे, कल्पना शेलार, भानुदास बागाव, गजानन गायकवाड, सतीश खुडे, श्रीकांत पाथरकर, सागर लोंढे, अजय नागे, शब्बीर शेख, ऍड.उमेश शिंदे, कंत्राटदार योगेश हिंगणे, उत्तम धोत्रे, संग्राम काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्र.17 मध्ये प्रामुख्याने 5 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी वॉटर सॉफटनर प्लॅन्ट बसविणे, आमराई मोठी विहीर पडझड झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करणे, पोस्ट ऑफिस कार्यालया समोरून जाणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ (स्टॅम्प कॉंक्रीट) करणे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (स्मारक) या ठिकाणी हजारो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्या ठिकाणी वॉटर कुलर (थंड पाणी फिल्टर) बसविणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला.