बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांची पदोन्नतीवर मुंबईला बदली झालेने गेल्या 80 दिवसांच्या रिक्त जागेवर महेश रोकडे हे नूतन मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. दरम्यान महेश रोकडे यांनी या पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून तर नांदेड, इंदापूर, विटा, शिरुर येथे बारा वर्षे मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. बारामती नगरपरिषदेत प्रलंबित बिले, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करावा लागणार आहे. बारामतीत अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था यामुळे शहराला विद्रुपीकरणाचे रूप आलेले आहे. श्री.रोकडे यांनी नगरपालिका अधिनियम व मुख्याधिकारी यांचे हक्क व कर्तव्याच्या चाकोरीत राहुन काम केल्यास काम करणे सोपे जाईल. ऐकावे जणाचे करावे अधिनियम, अटी, नियम व शर्तीनुसार अशी पद्धत ठेवल्यास कारकिर्द यशस्वी ठरल्याशिवाय राहणार नाही. बारामती नगरपरिषदेत दोन गटाबाबत भरपूर चर्चा आहे. या दोन्ही गटाला सामोरे जावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांमध्ये आलेली मरगळ दूर करावी लागणार आहे.