बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र शासनाने ऊर्जा विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना जाहीर केलेली असताना त्याबाबत वृत्तपत्रातील बातमी सोडली तर कुठेही जनजागृती करताना दिसत नाही त्यामुळे तातडीने या योजनेची अंमलबजावणी करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बारामती तालुका सरचिटणीस संजय वाघमारे यांनी दि.6 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विज वितरण कंपनीच्या कोणत्याही इमारतीवर या योजनेच्या माहितीबाबत फलक लावण्यात आलेला नाही यामुळे लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे तातडीने या योजनेची माहिती दर्शनी ठिकाणी लावून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशीही मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.