बारामती(वार्ताहर): सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणारे, अन्याया विरोधात आवाज उठविणारे बारामतीचे सुपूत्र चेतन रणधीर शिंदे यांची नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा सेवा संघाच्या बारामती तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र गिरी यांनी नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कंखर, उपाध्यक्ष गणेश डवरी, महासचिव गजानन इंगळे, सचिव गजेंद्र भिसे, कोषाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सदस्य अरुण पांडव, ऍड.राजू कासार, संतोष चिलवंते, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र गिरी, उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रभाकर वाघमारे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा रेणुताई येळगावकर, उपाध्यक्षा मीराताई शिंदे, कार्याध्यक्ष गीताताई गायकवाड, महासचिव अरुणकुमार कांबळे, सहसचिव उमेश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन लासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करणार असल्याचे चेतन शिंदे यांनी सांगितले.