बारामती(वार्ताहर): बारामतीचा पहिला मानाचा गणपती श्री अखिल मंडई मंडळ बारामती श्री गणपती बाप्पाच्या चरणी बारामती नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्या वतीने 1 लाख 11 हजार 111 रूपयांचा चांदीचा हात अर्पण करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश धालपे, नागेश कासार, पंकज दळवी, आशिष घोरपडे, चेतन वाडेकर, मयुर नगरकर, आकाश दुगड, आनंद खुळपे, स्वप्नील खरात, अनिकेत धालपे इ. मान्यवर उपस्थित होते.
अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी झाले. सालाबादप्रमाणे यंदाही घरोघरी गणरायाचे आगमन झाले. करोनाचे सावट असले तरी उत्साह कुठेही कमी दिसत नव्हता.