सहारा फौंडेशनच्या लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती(वार्ताहर): एकता इंग्लिश मीडियम स्कूल,मोरगाव रोड, बारामती या ठिकाणी सहारा फाउंडेशन च्या माध्यमातून लसीकरण केंद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.सदानंद काळे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, माजी नगरसेवक अनिल कदम, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, सहयाद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी माने, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद, डॉ.संदेश शहा, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन विलास बोरावके, उद्योजक शेवंतीलाल दोशी इ.मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या लसीकरण केंद्रातून मोरगाव रोड, खंडोबानगर, सिकंदरनगर, जामदार रोड, कसबा, मेडद येथील नागरिकांनी लसीकरण करून घेतले. आतापर्यंत 500 डोस यशस्वीरीत्या देण्यात आले असल्याचे सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!