बारामती(वार्ताहर): माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवती बारामती शहराध्यक्षा सौ.आरती गव्हाळे (शेंडगे) यांच्या माध्यमातून विदर्भातील कार्यकर्त्यांच्या अडचणी व पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी विदर्भ विकास समितीचे अध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिल जवारे, विदर्भातील बौद्ध भिक्षु संघाचे भन्ते शाकू बोडिल, राजरत्न (वर्धा), मिलिंद येरो (यवतमाळ), नंद (नागपूर), कार्यकर्ते दिनेश वाघ, महेश भाकरे, गोपाल मांडवकर, चंद्रकांत भोयर, संदीप नांदूरकर, अजय भोळी, अरविंद बगाडे इ. उपस्थित होते.