मामांवर कारवाई : खंडणीखोरांचे काय?

दहा वर्ष तुरूंगात असणार्‍या आरोपीला न्यायाधीश साहेबांनी निर्दोष मुक्त केले किंवा त्या आरोपीची पुराव्यानिशी बाजु न्यायालयासमोर वकीलांनी मांडली तर त्या आरोपीसाठी हे दोघेही चार भिंतीतील देवापेक्षा श्रेष्ठच ठरतात ना? एखाद्या गरीब, गरजू, अठरा पकड दारिद्रय नशिबी असणार्‍या व्यक्तीचे महसुल, पोलीस इ. खात्यातील काम सामाजिक कार्यकर्त्याने मार्गी लावून दिले तर त्या गरीब व्यक्तीचा तो देव ठरतो. किचकट शस्त्रक्रिया करून डॉक्टराने रूग्णाचा प्राण वाचविला तर तो डॉक्टर, नर्स व त्यांचे सर्व सहकारी त्या रूग्णासाठी देवरूपी ठरतात.

या वरील विविध घटकात इमाने-इतबारे काम करणारी मंडळींनी त्या आरोपी, व्यक्ती किंवा रूग्णाला पत्र पाठवून आमच्याकडे या आम्ही तुला मदत करतो, तुला न्याय, दु:खातून बाहेर काढतो दिलासा देतो असे सांगितलेले नसते. तर त्या-त्या क्षेत्रात तज्ञ असणारी मंडळींचा समाजात असणारा प्रभाव, कृती व विश्र्वास पाहूनच व्यक्ती यांच्याकडे सरसावला, आकर्षिला जातो हे मान्यच करावे लागेल. मात्र हे सर्व शेवटपर्यंत करण्यासाठी पैसा खर्चच करावा लागतो यात शंका नाही. विश्र्वसाने आपण यांच्याकडे जातो.

या सर्व प्रकारात काही अनर्थ घडला तर हेच डोक्यावर घेणारे देव डोक्यात बसतात आणि चुकून त्या व्यक्तीच्या हातून काही तरी अनर्थ घडतो. मग तक्रारी, निवेदन, आंदोलन केले जाते इतकेच नाही तर संबंधितावर हल्ला सुद्धा केला जातो.

महाराष्ट्रात अनिष्ट प्रथांविरूद्ध गेली काही दशके महाराष्ट्र अंध:श्रद्धा निर्मूलन समिती लढा देत आलेली आहे व देत आहेत. या समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना नागरीकांमध्ये असणारी अंध:श्रद्धा प्रखरपणे दूर करण्यामध्ये त्यांनी आपला प्राण गमवला, त्यांची हत्त्या करण्यात आली. आजही त्यांचे हत्त्यारे मोकाटच आहेत. त्यांच्या हत्तेनंतर शासनाला जाग आली आणि त्यांनी अंध:श्रद्धा निर्मूलन जाटूटोना प्रतिबंध कायदा संमत केला. मात्र हा कायदा पाहिजे तसा तळागाळापर्यंत पोहचविण्यास शासन उदासीन दिसते. एवढं असताना आजही अनिष्ट प्रथांना सुशिक्षित, हुशार नागरीक जर बळी पडत असतील तर हा दोष कोणाचा?

भारतीय दंड विधान कायद्यात संमती या शब्दाचा वापर करून एखाद्या कृतीला गुन्हा मानला जात नाही. उदा.जेव्हा एखादा रूग्ण, रोगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो तेव्हा तो स्वसंमतीने उपचार स्वीकारतो त्या उपचारामुळे रूग्णास किंवा रोग्यास काही इजा झाली, तरी डॉक्टरला दोषी धरता येत नाही अर्थात यामध्ये डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा नाही हे सिद्ध करावे लागते.

ज्या झाडाला आंबे असतात त्याच झाडाला लोकं दगडी मारीत असतात, वेड्या बाभळीला का मारीत नाही हो! मनोहर भोसले उर्फ मामा यांनी स्वत:चे सामर्थ किंवा योग सामर्थ वापरून काही आश्र्चर्य वाटेल असे करीत असतील तर त्यास बुवाबाजी म्हणता येईल का? पण एखादा व्यक्ती व्यसनापासून वाईट कृत्यापासून सुधारणावादी होत असेल तर कोणाला नवल वाटू नये.

अल्पावधीत मामांचे वाढते प्रेमी, मंत्री महोदयांशी निर्माण झालेले संबंध इ. मुळे मामा बहुचर्चिला आले. त्यांचा प्रसार व प्रचार वाढू लागला तसतशी धार्मिक, सामाजिक व आर्थिक उन्नती झाली. हे सर्व करीत असताना मामांना काही व्यक्तींनी ब्लॅकमेल केले, लाखो करोडो रूपयांची खंडणी मागितली मग मामांना वेठीस धरणार्‍या खंडणी खोरांचे काय? म्हणजे या खंडणीखोरांनी तक्रार करायच्या, तक्रारदार उभे करायचे, मुहबोली दाम बोलायचे आणि स्वत:चा स्वार्थ साधून घ्यायचा. मग सर्वसामान्य नागरीकांना पडलेला प्रश्र्न असा की, वरील नमूद केलेल्या घटनेतील वकील, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, नर्स व त्यांचे सहकार्‍यांनी जीवाचे रान करून घेतलेल्या पैश्याला जागून तत्पर सेवा देतात. समोरच्याचे मन जिंकतात मामांनी सुद्धा नागरीकांच्या जीवनात आलेले दु:ख, यातना दूर करण्यासाठी पैसे घेऊन कामे केली असे म्हणतात. मग मामांच्या तक्रारी देणारे, तक्रारदार उभे करणारे, घरात बसून किंवा चौकात, चावडीत चकाट्या मारत ब्लॅकमेल, खंडणी मागून लाखो, करोडे रूपये स्वत:च्या घशात घालीत असतील तर वरील घटतील तत्पर सेवा देणारे वकील, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, नर्स त्यांचे सहकारी व मामा पैसे घेऊन करीत असलेले काम चांगले ना? मामाच्या कामातून संबंधीत व्यक्ती वाम मार्गाला तर लागत नाही तो स्वत: सुधारणावादी होवून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची संधी उपलब्ध करून देतो. मात्र ब्लॅकमेल, खंडणीखोर पैसे घेऊन स्वत:चा स्वार्थ साधून पुन्हा हीच मंडळी खरंच मामांचे काम चांगले बरं का? असे म्हणण्यासाठी दंड थोपटत पुढे येतील. मग शेवटी म्हणावे लागते श्रेष्ठ कोण ठरले बरे?

2 thoughts on “मामांवर कारवाई : खंडणीखोरांचे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!