बारामती(वार्ताहर): कोरोना काळात कित्येकांच्या हातचे काम गेले तर काहींना आपले जीव गमवावे लागले. सध्या काम आणि आपले स्वास्थ ही गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण करण्यासाठी वेदिका जॉब कन्सलटंन्सी ऍण्ड इश्युरन्स् सर्व्हिसेस काम करतील असा विश्र्वास बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केला.
देवकाते हॉस्पीटल जवळ पीबीके हाईटस् बारामती येथे वेदिका जॉब कन्सलटंन्सी ऍण्ड इश्युरन्स् सर्व्हिसेस कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी श्री.आंधळकर बोलत होते.
यावेळी पुण्याचे उद्योजक रोहिदास दांगट पाटील, गिरिराज हॉस्पीटलचे डॉ.रमेश भोईटे, नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख, गावडे हॉस्पीटलचे डॉ.पांडूरंग गावडे, मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष अस्लम शेख, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमिन शेख, डॉ.गायकवाड, अजित मासाळ, श्री.पंत, सोमनाथ इंगळे, पप्पू घोलप, शरद हुलावळे, दिनेश उर्फ बबलू जगताप, ऍड.अशोक पाटील, आनंद लोंढे, स्वप्नील फरांदे, दिनेश खत्री इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आंधळकर म्हणाले की, पवार साहेबांच्या बारामती भूमित आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांवर प्रेम करणारी मंडळी आहेत हे आमचे भाग्य समजतो. आज पैसा कोणालाही मिळेल मात्र, जीवापाड प्रेम करणारी मंडळी मिळणे अशक्य आहे. कोरोना महामारीत सर्वजण जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाआघाडी सरकारने कोरोना काळात केलेली कामगिरी उल्लेखनिय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक घडामोडीवर जातीने लक्ष देऊन सतर्कता बाळगत आहेत. लसीकरण मोहिम सक्षमपणे राबवीत आहेत. राजकारणाबरोबर समाजकारण करणे महत्वाचे असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज मंदिरे बंद आहेत. देवापेक्षा सध्याच्या काळात डॉक्टर देवाचे दूत बनून प्रत्येक नागरीकांची सेवा करीत आहेत. कोरोनाने खूप काही शिकवले असल्याचे उद्योजक रोहिदास दांगट पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
लसीकरणामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने वेदिका जॉब कन्सलटंन्सी ऍण्ड इश्युरन्स् सर्व्हिसेसने उद्घाटना बरोबर रक्तदान शिबीराचे आयोजन सुद्धा केले होते. 50 रक्तदात्यांनी सहभाग दर्शवून रक्तदान केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार व आभार वेदिका जॉब कन्सलटंन्सी ऍण्ड इश्युरन्स् सर्व्हिसेसचे मालक आरोग्य मित्र कृष्णा जेवाडे व बाळासाहेब मदने यांनी मानले.
आरोग्य मित्र कृष्णा जेवाडे यांचेबाबत…
श्री.जेवाडे हे आरोग्य मित्र म्हणून आरोग्य क्षेत्रात गेल्या 7 ते 8 वर्षापासून सेवा करीत आलेले आहेत. कोविड-19 च्या काळात हॉस्पीटलच्या मागणीनुसार तत्पर डॉक्टर, नर्स, वॉडबॉय पुरविण्याचे काम त्यांनी केले. खरं तर कोरोना योद्धा म्हणून त्यांचेही खूप मोठे योगदान आहे. हे सर्व करीत असताना त्यांनी वेदिका जॉब कन्सलटंन्सी ऍण्ड इश्युरन्स् सर्व्हिसेसच्या माध्यमातून आरोग्य विमा, जीवन विमा, वाहन विमा, वाहन कर्ज व आर्थिक सल्ला इ. सुविधा एकाच छताखाली देण्याचे सुरू केले आहे. आतापर्यंत विमा, आरोग्य व नोकरीमध्ये खूप मोठे काम त्यांनी केले आहे, यापुढेही ते अशाप्रकारे तत्पर, चोख व विश्र्वासाने सेवा देतील यामध्ये तिळमात्र शंका नाही.