अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे शाखा लासुर्णे (ता.इंदापूर) येथील एटीएम सेंटरचा उद्घाटन समारंभ शनिवार दि.11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. तर पिंपरी बु।। (ता.इंदापूर) शाखेचा स्थलांतर समारंभ सकाळी 11.30 वा. राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन सौ.अर्चना घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सदरचा कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शाखा पिंपरी बु।।, ता.इंदापूर, जि.पुणे याठिकाणी कोविड-19 चे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., पुणे चे अध्यक्ष रमेशआप्पा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पिंपरी बु।। ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.ज्योती बोडके, वि.का.से.सह.सोसायटी, पिंपरी बु।।चे चेअरमन सुदर्शन बोडके या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी नागरीकांनी कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करून आवर्जुन उपस्थित रहावे असेही आवाहन संचालक मंडळाने केले आहे.