बारामती(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेनऊ वाजता बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर, शारदा प्रांगण बारामती याठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष ॲड.किरण इंगळे यांनी कळविले आहे.
या शोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थेचे, सेलचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, बूथ कमिटीतील सर्व पदाधिकारी, समन्वयक, युवक, महिला पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, डॉक्टर, वकील, सर्व व्यावसायिक व व्यापारी वर्ग, पत्रकार बंधू, सर्व सामाजिक कार्यकर्ते, तसेच सर्व बारामतीकर यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन बारामती शहर महिलाध्यक्षा सौ.अनिता गायकवाड व युवकाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी केले आहे.