बारामती: अजित पवार हे सर्वसामावेशक असे नेतृत्व होते ते शिव शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारधारेने चालत होते असे विविध मान्यवरांनी शोकसभेत बोलताना व्यक्त केले. प्रथमतः स्वर्गीय लोकनेते अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या शोकसभेत सतीश देवकाते, नितीन देवकाते, उत्तम मदने, सुनिल बनसोडे, संदिप केसकर, दादासाहेब केसकर, आबासाहेब केसकर, तुलशीदास केसकर यांनी शोक व्यक्त करताना म्हणाले की, महिला सबलीकरणासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न केले. लाडकी बहीण योजनेचा प्रभावी अंमल त्यांनी केला. बारामती तालुक्यात हजारो कोटींची विकासकामे केली आहेत. गोरगरीब नागरिकांना सर्व सेवसुविधा नियुक्त सुसज्ज असे वैद्यकीय मेडिकल हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल उपलब्ध करून दिले आहे. पर्यटन व टेक्स्टाईल पार्क कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या हाताला काम व रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
बारामती विद्येचे माहेर घर म्हणून नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. आधुनिक पद्धतीचे झाडांनी सुसज्ज असे रस्ते व प्रशासकीय सेवा सुविधा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले आहेत. जनता दरबाराच्या माध्यमातून लाखो हजारो गोरगरीब नागरिकांच्या समस्या अडीअडचणी त्यांनी तात्काळ सोडवले आहेत. त्यांचे कार्य बारामतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तेवढ्यात ताकतीचे होते असा शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा विकास पुरुष आयडॉल पुन्हा अनेक युगात होणे नाही. या शब्दात सर्वांनी भावनिक मनोगत व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती गुणवडी गणाच्या उमेदवार निलम राजेंद्र शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार शुभांगी सुनिल आगवणे यांना जाहीर पाठिंबा दिला. पाठिंब्याची अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप केसकर यांनी केली.
उपस्थित सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषेदेच्या उमेदवार शुभांगी कचेर शिंदे व पंचायत समितीच्या उमेदवार शुभांगी सुनिल आगवणे या दोन्ही उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान करून प्रचंड मताधिकाने विजय करण्याचा निर्धार केला. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भावनिक मनोगत व्यक्त केले.
यावेळी छत्रपती कारखाना संचालक सतीश देवकाते, बारामती तालुका खरेदी विक्री संघांचे व्हा.चेअरमन नितीन देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप केसकर, फलोत्पादन संघाचे संचालक उत्तम मदने, रघुनाथ देवकाते, सामाजिक कार्यकर्ते व मा.सरपंच हरिभाऊ केसकर, मा. सरपंच राजेंद्र केसकर,पिंपळी विविध विकास सोसायटीचे मा.चेअरमन दादासो केसकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तांबे, पिंपळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष केसकर, मा.अध्यक्ष बापूराव केसकर, प्रमुख ग्रामस्थ तुलशीदास केसकर,अक्षय केदार, आबासाहेब केसकर, प्रताप माने,गणेश केसकर, उमेश केसकर तसेच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.