अशोक घोडके यांजकडून…
गोंतडी(वार्ताहर): बहुजन परिषद संघटनेच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव निमसाखर जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय मिसाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सचिन कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
बहुजन परिषद संघटना इंदापूरच्या पदाधिकार्यांची बैठक श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थांनी बहुजन परिषद संघटनेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे होते. यावेळी राज्य सदस्य मंडळाचे सदस्य शैलेंद्र चव्हाण, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष संजय राऊत व बहुजन परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय बाबर उपस्थित होते.
या बैठकीत बहुजन परिषद संघटनेचे काम वाढावे नागरीकांचे प्रश्र्न मार्गी लागावे म्हणून तालुक्यातील काही पदाधिकार्यांना संघटनेमध्ये पदाची जबाबदारी देण्यात आली.
यामध्ये इंदापूर तालुका बहुजन परिषद संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अशोक शिंदे, तालुका उपाध्यक्षपदी निलेश सोनार (निमगांव केतकी), कळस-बोरी गटाच्या उपाध्यक्षपदी अमोल कुचेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लोखंडे व सचिव विजय गायकवाड यांच्या सहीने देण्यात आले. या निवडीनंतर सर्व पदाधिकार्यांचे बहुजन परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले.