विकासाची तेजोमय ‘किरण’ मावळली, मात्र उगवत्या तोंडसुख घेणाऱ्या ‘किरण’ला कोण थांबविणार!

बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाला अशी वार्ता पसरताच स्वतःहून बारामतीच नव्हे तर इतर तालुके व जिल्ह्यात स्मशान शांतता पसरली. बारामतीचा कणकण ज्यांच्याशी जोडलेला होता ते अजितदादा कायमचे निघून गेले आणि संपूर्ण बारामतीवर शोक पसरला.

अजितदादा हे फक्त नाव नव्हते तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचा विश्वास होता. सामान्य माणसाच्या अडचणीला आपलीच अडचण मानणारे नेतृत्व अचानक हरपल्याने बारामती पोरकी झाली आहे. आज दुकाने उघडी असली तरी व्यवहार थंडावले आहेत. बारामतीकर एकमेकांकडे पाहून निःशब्द झाले आहेत. अजितदादा आता नाहीत हे सत्य स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण झाले आहे. बारामतीकरांना दिलेला आधार, दिलेले बळ आणि दाखवलेली दिशा कायम स्मरणात राहील.

अशी विकासाची तेजोमय किरण मावळली, मात्र काही उगवत्या तोंडसुख घेणाऱ्या किरणला कोण थांबविणार अशी बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. मी दादांच्या खूप जवळचा होतो. अपघात झालेनंतर घड्याळावरून बॉडी दादांची आहे, केसापासून नखापासुन दादांबाबत माहिती आहे असे काही सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात घड्याळ हातात नव्हतेच हे त्रीकाळ सत्य असताना, काही मंडळींना काहीच माहिती नसताना तोंडसुख का घेत आहेत हेच कळत नाही.

दादा माझ्याबरोबर जेवले, दादा म्हटले तुझ्याबरोबर फिरायला जायचे आहे. दोन महिन्यातील दादांचा दौऱ्याची रूपरेषा पाहिल्यास दादांना यांच्याबरोबर फिरायला वेळ कधी होता हे कळेल. मग या जवळचा व्यक्ती म्हणवणाऱ्यांना दादा कधी म्हटले हा सुद्धा प्रश्न समोर येतो. बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत संपूर्ण मतमोजणी झालेनंतर मी दादांच्या खुप जवळचा असे म्हणणाऱ्याला अजितदादांनी फोन केला. या बहाद्दराने फोन सुद्धा उचलला नाही आणि म्हणे मी दादांच्या खुप जवळचा (अजितदादांच्या एका पीएने आमच्याशी साधलेल्या हितगुजातून गोष्ट समोर आली) या बहाद्दराने तर कधी कधी स्वतःचे आडनावाच्या जागी पवार हे आडनाव लावून इतर जिल्ह्यातील लोकांची दिशाभूल सुद्धा केलेली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी विलीकरणाबाबत बारामतीतील कोणत्याच नेत्याला (घंटा) माहिती नसताना, काही स्वतःची टेरी बडवित मी त्याचा साक्षीदार आहे, मी विलीकरणाच्या बैठकीत होतो असे म्हणत आहे. विलीकरणाबाबत बारामतीतील कोणत्याही टॉवरची रेंज सुद्धा तिथ पर्यंत पोहचलेली नसताना, तरीही तोंडसुख घेत असतील तर खूप अवघड आहे. आज स्व.अजितदादा असते तर या तोंडसुख घेणाऱ्याची भर सभेत हजेरी घेतली असती आणि पिछवाड्यावर लाढ मारून बाहेर काढले असते.

अजितदादा आज आपल्यात नाही मात्र त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा कधीही पुसला जाणार नाही. अजितदादा शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि त्यांनी रूजवलेली माणुसकी सदैव जिवंत राहील यात शंका नाही. बारामतीत जातीय तेढ कधी निर्माण होऊ नये. दोन गटात वाद विवाद होऊ नये बारामती सतत शांत रहावी अशी इच्छा त्यांच्या मनोमन होती.

तोंडसुख घेणाऱ्यांना बारामतीकरांनी इशारा दिला आहे की, ज्यांची प्रतिमाच नाही अशांनी न घडलेल्या घटना सांगून खोटी प्रतिमा तयार करू नये. मी खूप जवळ होतो असे सांगून लोकांची दिशाभूल करू नये. स्वतःचा स्वार्थ, प्रतिष्ठा किंवा राजकीय फायदा साधू नये. तोंडसुख घेणारी व्यक्ती स्वतःची उंची वाढवण्यासाठी स्व.अजितदादांच्या नावाचा वापर करतात हे दुर्देवी आहे. स्व.अजितदादा असताना सुद्धा त्यांची दिशाभूल केली, आता तरी तोंडसुख घेणाऱ्यांनी आपले तोंड बंद करावे असेही बारामतीकर बोलताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!