अशोक घोडके…..
गोतोंडी,ता. इंदापूर येथे शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी अॅपचे प्रात्यक्षिक दाखवून ई-पीक पाहणी या प्रकल्पाचा शिवारात शुभारंभ करण्यात आला.
महसूल विभागाने आपल्या पिकाची नोंदणी सुविधा थेट शेतकरी उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र मोबाईल अॅपद्ववारे निर्मिती केली आहे.
शेतकरी बांधवांनचे शेत जमिनीचे उतारा अचूक पिकांची नोंदीमुळे शेतकरी यांचे उत्पादन शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ,अतिवृष्टीमुळे किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकरी यांना पीक कर्जही दिले जाणार आहे त्यामुळे याचा फायदा होणार आहे.
अॅपचे प्रात्यक्षिक प्रशांत कांबळे तलाठी भाऊसाहेब,गुरुनाथ नलवडे सरपंच आणि सौ.राजश्री हरिभाऊ खाडे पोलिस पाटील गोतोंडी व शेतकरी बांधव उपस्थित राहून यांना ई-पीक पाहणी नोंदणी बाबत माहिती देण्यात आली.
यावेळी गोतोंडी परिसरात उत्तम पद्धतीने शेतकरी यांना मार्गदर्शन मिळाले आणि स्वतः आपण आपली ई-पीक पाहणी नोंदणी सुरूवात चांगल्या स्वरूपात झालेली आहे.