बारामती(वार्ताहर): बँक, फायनान्स् व पतसंस्थांकडून कर्ज वसुलीच्या नाहक त्रासाबाबत बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांनी तहसिलदार यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी आदेश दिले आहे. तसे 1 सप्टेंरब 2021 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
सध्या हाताला काम नसल्याने हप्ते भरण्यास होत नाही. सततच्या लॉकडाऊन, संचारबंदी मुळे सर्वसामान्य नागरीकांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. 26 वर्षीय हौशी नाट्यकलावंत राहुल संकपाळ नावाच्या युवकाने दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी खासगी वसुली कंपनीच्या एजंटनी टाकलेल्या दबावामुळे या युवकाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्तेपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून उघड झाले आहे.
मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी प्रत्येक बँक, फायनान्स्, पतसंस्था यांनी ठेवलेल्या पंटर एजंट कडून ग्राहकांची पिळवणूक होत आहे. पैसे दिले नाही तर गैरमार्गाने पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असतात. अस्लम शेख यांनी वेळोवेळी प्रशासनाशी केलेला पत्रव्यवहारामुळे प्रशासनाने दखल घेतली आहे.
दि.13 ऑगस्टला प्रांत व तहसिलदार यांना लेखी निवेदनावर कळविले होते. त्यानुसार प्रांतांनी तहसिलदार यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. आपणास बँक, फायनान्स् व संस्थांचे वसुली अधिकारी त्रास देत असतील तर अस्लम शेख (9552454347) या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.